वीज पडून चाळीसगाव येथे बैल ठार २३ मि.मी.पाऊस : पारोळा, अमळनेर व मुक्ताईनगर तालुक्यात गारपीट
By admin | Updated: May 11, 2016 00:26 IST
जळगाव : जिल्ात सोमवारी झालेल्या वादळी व अवकाळी पावसात चाळीसगाव येथे बैलाच्या अंगावर वीज कोसळल्याने ठार झाला. पारोळा, अमळनेर व मुक्ताईनगर येथे झालेल्या गारपीटमुळे नुकसान झाले.
वीज पडून चाळीसगाव येथे बैल ठार २३ मि.मी.पाऊस : पारोळा, अमळनेर व मुक्ताईनगर तालुक्यात गारपीट
जळगाव : जिल्ात सोमवारी झालेल्या वादळी व अवकाळी पावसात चाळीसगाव येथे बैलाच्या अंगावर वीज कोसळल्याने ठार झाला. पारोळा, अमळनेर व मुक्ताईनगर येथे झालेल्या गारपीटमुळे नुकसान झाले.२३ मि.मी.पावसाची नोंदमंगळवारी वादळी वार्यासह गारपीट व अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात जामनेर तालुक्यात दोन मिमी, भडगाव तालुक्यात ७.७५ मिमी, अमळनेर ८ मिमी, पारोळा ४.६० मिमी, पाचोरा ०.७१ मिमी असा २३.०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पाऊस १.५४ मिमी होता.पाच तालुक्यात गारपीटमंगळवारी झालेल्या अवकाळी पावसात पारोळा तालुक्यातील मोंढाळे, पिंपरी, तरडी, येळी, देवगांव तसेच अमळनेर व मुक्ताईनगर, यावल व रावेर तालुक्यात गारपीट झाली.बैल ठार, रुग्णवाहिकेचे नुकसानअवकाळी पाऊस व गारपीटमुळे चाळीसगाव येथे बैलाच्या अंगावर वीज कोसळल्याने तो मृत झाला. तर फैजपूर येथे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे नुकसान झाले आहे. गारपीटमध्ये लिंबू व फळपिकांचे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाने नुकसान क्षेत्राचा पंचनामा करून शासनाकडे अहवाल पाठविला आहे.