शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

२३... खापा... रेती

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

(फोटो)

(फोटो)
रेतीची अवैध वाहतूक
चार ट्रॅक्टर पकडले : १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
खापा : उपविभागीय पोलीस अधिकारी (परिविक्षाधीन) मंगेश चव्हाण यांच्या पथकाने गस्तीदरम्यान केलेल्या कारवाईमध्ये अवैध रेतीवाहतुकीचे चार ट्रॅक्टर पकडले. यात तीन ब्रास रेतीसह एकूण १२ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोसेवाडी शिवारात करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी (परिविक्षाधीन) चव्हाण हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गुरुवारी रात्री खापा परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, कन्हान नदीच्या गोसेवाडी रेतीघाटातून रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती चव्हाण यांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे या पथकाने गोसेवाडी परिसराची पाहणी केली.
दरम्यान, एमएच-४०/ए-३९३, एमएच-४०/एल-५९७९, एमएच-४०-एल-४२६९ व विना क्रमांकाचा एक असे चार ट्रॅक्टर रेतीघाटातून बाहेर येत असताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी चारही ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता, त्यांच्या ट्रॉलीमध्ये रेती असल्याचे निदर्शनास आले. कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान सदर रेती विना रॉयल्टी असल्याचे स्पष्ट होताच चारही ट्रॅक्टर व त्यातील रेती जप्त करण्यात आली.
या कारवाईमध्ये सहा हजार रुपये किमतीच्या तीन ब्रास रेतीसह एकूण १२ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खापा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात खाप्याचे प्रभारी ठाणेदार विजयकुमार तिवारी, रामेश्वर कटरे, गजानन उकेबोंदरे, रवींद्र डोरले, गुड्डू निखारे, मधुकर खंडारे आदींनी केली. (प्रतिनिधी)
***