शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

२२ गिर्यारोहकांना जवानांनी वाचविले

By admin | Updated: August 9, 2015 01:23 IST

जम्मू-काश्मीरच्या लडाख क्षेत्रात मुसळधार पावसामुळे अडकलेल्या इंग्लंड आणि फ्रान्सच्या २२ गिर्यारोहकांना भारतीय वायुसेनेच्या जवानांनी गेल्या दोन दिवसात सुरक्षित बाहेर काढले.

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या लडाख क्षेत्रात मुसळधार पावसामुळे अडकलेल्या इंग्लंड आणि फ्रान्सच्या २२ गिर्यारोहकांना भारतीय वायुसेनेच्या जवानांनी गेल्या दोन दिवसात सुरक्षित बाहेर काढले.सेनेच्या उत्तरी कमांडचे प्रवक्ते कर्नल एस.डी. गोस्वामी यांनी शनिवारी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, अत्यंत वाईट हवामानातही वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्सनी धाडस करून लडाखच्या अत्युच्च क्षेत्रात अडकलेल्या गिर्यारोहकांना ६ आणि ७ आॅगस्टला सुरक्षित बाहेर काढले. यामध्ये इंग्लंडचे २१ आणि फ्रान्सच्या एका नागरिकाचा समावेश आहे. सतत पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे लडाख क्षेत्रातील इंडस, नुब्रा, शयोक आणि तिच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रस्ते वाहतूक आणि दूरध्वनी सेवाही विस्कळीत झाली आहे. मरखा खोऱ्यात अडकलेल्या या लोकांपैकी काही अस्थमापीडित होते. वायुसेनेच्या ताफ्यातील प्रमुख हेलिकॉप्टर ‘सियाचीन पायोनिअर्स’ने ही मोहीम फत्ते केली. (वृत्तसंस्था)