२२.... गुन्हे
By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST
तरुणाची गळफास लावून आत्महत्या
२२.... गुन्हे
तरुणाची गळफास लावून आत्महत्यानागपूर : तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनिमंदिर परिसरातील शिवारात बुुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारस निदर्शनास आली.नरेश बुधाजी गुरनुले (२३, रा. कऱ्हांडला, ता. उमरेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. नरेश हा मागील काही वर्षांपासून बुटीबोरी येथे राहायचा. तो १६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास गावाला जात असल्याचे सांगून निघून गेला होता. तो दुसऱ्या दिवशी बुटीबोरी येथे परत न असल्याने त्याच्या मित्रांनी त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशीही केली. मात्र, तो गावाला आला नसल्याने त्यांना सांगण्यात आले. दरम्यान, घरच्या मंडळींनी त्याची शोधाशोध सुरू केली. परंतु, कुठेही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे बुटीबोरी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविण्यात आली होती. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह शनिमंदिर परिसरातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.***मेडिकल स्टोअर्समध्ये चोरी नागपूर : कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौदा मैल येथे घरफोडी झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. यात चोरट्यांनी १७ हजार रुपये किमतीचे साहित्य पळविले.फिर्यादी कविश गुलाबराव देवासे (३०, रा. नागपूर) यांचे चौदा मैल परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. ते मंगळवारी रात्री दुकान बंद करून घरी आले. दरम्यान, मध्यरात्री चोरट्यांनी सदर दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील १७ हजार रुपये किमतीचे विविध साहित्य घेऊन पळ काढला. दुसऱ्या दिवसी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ***