२२... गुन्हे... जोड...०१
By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST
सव्वा लाखाचा ऐवज लंपास
२२... गुन्हे... जोड...०१
सव्वा लाखाचा ऐवज लंपासकामठी येथे घरफोडी : रोख रकमेसह सोन्याचे दागिने पळविलेकामठी : शहरातील खलाशीलाईन, मोदीपाडाव परिसरात बुधवारी मध्यरात्री घरफोडी केल्याची घटना घडली. यात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३८ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. फिर्यादी नरेंद्र डोमाजी वाघमारे (५४, रा. खलाशीलाईन, मोदीपाडाव, कामठी) हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. घरी कुणीही नसल्याचे पाहून चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दरम्यान, चोरट्यांनी कपाटातील ४० हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ३८ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज घेऊन पळ काढला. नरेंद्र वाघमारे हे गुरुवारी सकाळी घरी आले, तेव्हा त्यांना घराचे दार उघडे असल्याचे निदर्शनास आले. आत डोकावून पाहताच चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच कामठी पोलिसांना सूचना दिली. याप्रकरणी कामठी पोलिसांनी भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)***