हैदराबाद : राज्यनिर्मितीनंतर दोन वर्षांनी मोठे प्रशासकीय बदल करताना तेलंगणा सरकारने मंगळवारी २१ नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली. त्यामुळे राज्यातील जिल्ह्यांची संख्या आता ३१ झाली आहे. तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) २०१४ मध्ये निवडणुकीदरम्यान नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचे आश्वासन दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक आणि इतर सरकारी कार्यालये सुरू होण्यासह नव्या जिल्ह्यांचे कामकाज आजपासून सुरू झाले. (वृत्तसंस्था)
तेलंगणात २१ नवीन जिल्हे
By admin | Updated: October 12, 2016 05:34 IST