शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूल कोसळून २१ ठार

By admin | Updated: April 1, 2016 05:05 IST

उत्तर कोलकाताच्या वर्दळीच्या मुख्य मार्गावर दोन कि.मी. लांब निर्माणाधीन फ्लायओव्हर कोसळून त्याखाली किमान २१ जण ठार तर सुमारे ८८ जण जखमी झाले आहेत.

कोलकाता : उत्तर कोलकाताच्या वर्दळीच्या मुख्य मार्गावर दोन कि.मी. लांब निर्माणाधीन फ्लायओव्हर कोसळून त्याखाली किमान २१ जण ठार तर सुमारे ८८ जण जखमी झाले आहेत. अनेक वाहने, फेरीवाले आणि पादचारी ढिगाऱ्याखाली दबले असल्याने १५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. गुरुवारी दुपारी कोलकात्यातील सर्वात मोठा घाऊक बाजार असलेल्या बडाबाजारजवळील टागोर मार्गावर ही घटना घडली आणि शहरात हाहाकार उडाला. अतिशय दाट वस्ती असलेला हा भाग आहे.जखमींना लगतच्या परिसरातील रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. पुलाचा काही भाग कोसळत असताना अनेक लोक, कार, आॅटोरिक्षा आणि हॉकर्स ढिगाऱ्याखाली दबत असल्याचे तर काही जण पळून जात असताना अचानक त्यात अडकल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते. अनेकांनी आरडाओरड करीत सुरक्षित स्थळी धाव घेतली तर काही लोक ढिगाऱ्याखाली दबून रक्तबंबाळ अवस्थेत मदतीची याचना करीत असल्याचे आणि मदतीसाठी धावून जाणारे त्यांना पाण्याच्या बाटल्या पुरवित असल्याचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. (वृत्तसंस्था)राव म्हणतात, देवाने केलेले कृत्य...हे दुसरे काही नसून देवाने केलेले कृत्य आहे, असा दावा हैदराबादच्या आयव्हीआरसीएल बांधकाम कंपनीचे पांडुरंग राव यांनी केल्यामुळे चौफेर टीका होऊ लागली आहे. यापूर्वीच्या डाव्या आघाडीच्या सरकारने २००९ मध्ये संबंधित निविदा मंजूर केल्या होत्या. अनेकदा स्मरणपत्रे पाठवूनही हैदराबादच्या उपरोक्त कंपनीने सरकारला बांधकामासंबंधी विस्तृत आराखडा दिलेला नव्हता, अशी माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. प. मिदनापूर जिल्ह्णातील निवडणूक प्रचार अर्धवट सोडून त्या कोलकात्यात परतल्या.तृणमूल काँग्रेस - डाव्यांचा ब्लेम गेम...सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि डाव्यांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करीत ब्लेम गेम सुरू केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर असताना सदर फ्लायओव्हरचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.पाच लाखांची मदत...राज्य सरकार मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख तर गंभीर जखमींना तीन लाख रुपयांची मदत देण्यासह जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करणार आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली दबलेल्यांच्या मदतीसाठी पथक पाठविण्याचे आदेश गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला दिले. मोदींना दु:ख; केंद्राकडून मदत...कोलकात्यातील दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख झाल्याचे नमूद करतानाच केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत जाहीर केली आहे. ते सध्या अमेरिकेच्या भेटीवर असून त्यांनी टिष्ट्वटरवरून प्रतिक्रिया दिली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी शोकसंवेदना आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मोदींना फोनवरून सदर घटनेबाबत माहिती दिली.