शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

२१ ‘आप’ आमदारांवर अपात्रतेची तलवार

By admin | Updated: June 28, 2016 06:07 IST

आम आदमी पार्टीच्या (आप) ६७ पैकी तब्बल २१ आमदारांच्या डोक्यावर ‘लाभाचे पद’ धारण केल्यामुळे अपात्र ठरविले जाण्याची टांगती तलवार

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेवर निवडून आलेल्या आम आदमी पार्टीच्या (आप) ६७ पैकी तब्बल २१ आमदारांच्या डोक्यावर ‘लाभाचे पद’ धारण केल्यामुळे अपात्र ठरविले जाण्याची टांगती तलवार असून, या प्रकरणी निवडणूक आयोग काय निर्णय देते, याकडे लक्ष लागले आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने जिंकल्या होत्या. यापैकी मंत्री नसलेल्या २१ आमदारांना अलीकडेच ‘संसदीय सचिव’ (पार्लमेंटरी सेक्रेटरी) नेमण्यात आले.‘संसदीय सचिव’ हे सरकारमधील ‘लाभाचे पद’ (आॅफिस आॅफ प्रॉफिट) असल्याने या आमदारांना अपात्र घोषित करावे, यासाठी प्रशांत पटेल या वकिलाने निवडणूक आयोगाकडे याचिका केली आहे. त्यावर आयोगाने काढलेल्या नोटिशीला या आमदारांनी उत्तर दिले असून, ‘संसदीय सचिव’ हे ‘लाभाचे पद’ नाही. कारण या पदाला सरकारकडून कोणतेही मानधन मिळत नाही व या पदावरील व्यक्तीला कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे अपात्रतेचा प्रश्नच येत नाही, असा प्रतिवाद त्यांनी आपल्या उत्तरात केला आहे. पटेल यांच्या याचिकेला दिलेल्या लेखी उत्तराखेरीज आयोगाने आपल्याला व्यक्तिश: बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी विनंती या आमदारांनी केली. त्यानुसार, आयोग येत्या १४ जुलैपासून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>कायद्याचे कवच गेले...नेमणुकांनंतर वाद निर्माण झाला. अपात्रतेचा बडगा बसला, तर मोठी पंचाईत होईल हे लक्षात घेऊन केजरीवाल सरकारने ‘संसदीय सचिव’ हे पद ‘लाभाच्या पदां’मधून पूर्वलक्षी प्रभावाने वगळण्याचा कायदा विधानसभेत मंजूर करून घेतला. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने येथील विधानसभेने केलेला कायदा नायब राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतरच लागू होतो. केजरीवाल सरकारने हा कायदा नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यामार्फत मंजुरीसाठी पाठविला. परंतु राष्ट्रपतींनी तो स्वाक्षरी न करता परत पाठविला. त्यामुळे या आमदारांना संभाव्य अपात्रतेतून वाचण्यासाठी सध्या तरी कायद्याचे कवच उपलब्ध नाही, असे चित्र आहे.