शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर २0१९ मध्ये पाहून घेईन!, पंतप्रधान मोदी यांनी भाजपाच्या खासदारांना भरला सज्जड दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 03:47 IST

‘संसदेत सभागृहाचे काम चालू असताना तुम्ही गैरहजर राहूच कसे शकता? तुम्ही हजर राहावे, यासाठी वारंवार व्हिप का बजवावा लागतो? खासदार झालात म्हणजे तुम्ही स्वत:ला समजता काय? जे काही तुम्हाला मिळाले ते भाजपाने दिले आहे, हे लक्षात ठेवा.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : ‘संसदेत सभागृहाचे काम चालू असताना तुम्ही गैरहजर राहूच कसे शकता? तुम्ही हजर राहावे, यासाठी वारंवार व्हिप का बजवावा लागतो? खासदार झालात म्हणजे तुम्ही स्वत:ला समजता काय? जे काही तुम्हाला मिळाले ते भाजपाने दिले आहे, हे लक्षात ठेवा.आता पक्षाध्यक्ष अमित शहा राज्यसभेत आले आहेत. तुमचे मौजमजा करण्याचे दिवस संपले आहेत. यानंतरही तुम्ही वाटेल तसे वागलात तर २0१९ साली मी पाहून घेईन’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भाजपाच्या खासदारांना सज्जड दम दिला.भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा रुद्रावतार पाहून भाजपाच्या अनेक खासदारांना घाम फुटला होता. बैठकीला पक्षाचे अध्यक्ष व नवनिर्वाचित खासदार अमित शहा हेही उपस्थित होते.का भडकले पंतप्रधान?राज्यसभेत मध्यंतरी भाजपा खासदारांच्या अनुपस्थितीमुळे ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करणारे घटनादुरुस्ती आहे त्या स्वरूपात मान्य होऊ शकले नव्हते. उपराष्ट्रपतिपदाच्या मतदानाच्या वेळी जे १४ खासदार गैरहजर होते. त्यातील दोघे भाजपाचेही होते.याखेरीज गुजरातेत राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या तिसºया उमेदवाराचा पराभवही मोदी व शहा यांना बºयापैकी झोंबला आहे. पंतप्रधानांनी या तिन्ही घटनांची दखल घेतल्याचे जाणवले होते.