शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची २०१९ची तयारी

By admin | Updated: March 17, 2017 01:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना तरुणांमध्ये जा, असे सांगून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत २०१९च्या लोकसभा निवडणुकीची जणू तयारीच केली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना तरुणांमध्ये जा, असे सांगून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत २०१९च्या लोकसभा निवडणुकीची जणू तयारीच केली. ना मै बैठुंगा, ना बैठने दुंगा, असे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला नुसते बसलेले मी पाहणार नाही, असा जणू इशाराच दिला. पुढील दोन वर्षे अधिक जोमाने काम करणे गरजेचे असून, सतत मतदारांशी संपर्क साधणे, त्यांचे प्रश्न सोडविणे आणि सर्व समाजघटकांना एकत्र आणणे हे करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या.डिजिटल पेमेंट अ‍ॅप्लिकेशनसाठी ‘भिम अ‍ॅप’च्या वापराला प्रोत्साहन मिळावे म्हणून पक्षाच्या नेत्यांनी आठवडाभर काम करावे, लोकांना त्याची माहिती द्यावी, प्रशिक्षित करावे व त्यांना ते अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी सर्व खासदारांना केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशभरातील अनुयायांना भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.डॉ. आंबेडकरांचे काम आणि त्यांच्या योगदानाची प्रसिद्धी करा, असेही मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या लोककल्याण कामांचे आणि उत्तम प्रशासनाचे तरुणांना सदिच्छा दूत (अ‍ॅम्बेसडर्स) बनवा, असे आवाहन करून मोदी म्हणाले की, तरुण पिढी माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्रांपेक्षाही मोबाइल फोन्स आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी याच माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे. तरुण पिढी जेव्हा १२वीच्या वर्गात असते, त्याचवेळी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत पक्षाला मिळालेले यश हे लोकांनी जातियवाद, एकाच कुटुंबाची सत्ता आणि भ्रष्टाचाराविरोधात यामुळे आहे. लोककल्याण आणि उत्तम प्रशासनाचा कार्यक्रम राबवला जात असलेल्या मोदींच्या नेतृत्वाला दिलेला कौल आहे, असे अमित शाह म्हणाले. २०१४मध्ये लोकसभा निवडणुकातील पक्षाच्या विजयानंतर नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका या पक्षासमोर मोठे आव्हान होत्या, असे सांगून शाह म्हणाले की, दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकादेखील असेच मोठे आव्हान आहे. पक्षाच्या नेत्यांनी त्यासाठी तयारी करावी. केंद्र सरकारने राबविलेल्या लोककल्याणाच्या योजना आणि नोटाबंदीसारख्या धाडसी निर्णयाला लोकांनी पाठिंबा दिल्याचेच भाजपाच्या विजयातून दिसते, असा दावा शाह यांनी केला. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह म्हणाले की, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील उत्साहवर्धक यशानंतर लोकसभेच्या निवडणुका या पक्षासमोर मोठे आव्हान आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरची भाजपाच्या संसदीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती. मतदारांचे आभार आणि विजयाचा आनंद साजरा करताना पक्षाच्या प्रवासाचा मार्ग तयार करण्याचा उद्देश या बैठकीचा होता.नुकत्याच उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत लक्षणीय संख्येने दलितांनी भाजपाला मते दिल्याचे मानले जाते. दलितांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने पक्षाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून (१४ एप्रिल) आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करायचे ठरवले आहे. प्रत्येक पंचायत आणि वॉर्डात पक्ष आठवडाभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करील. याशिवाय पक्षाच्या स्थापना दिनी (६ एप्रिल) नेते आणि कार्यकर्ते ‘स्वच्छ भारत’ मोहिमेत सहभागी होतील.