शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

रेल्वे बनवणार ताशी २०० कि.मी. वेगाने धावणारे कोच

By admin | Updated: February 9, 2015 00:35 IST

ताशी २०० कि.मी. वेगाने धावणारे रेल्वे कोच बनविण्याची तयारी रेल्वेने चालवली आहे़ चेन्नई येथील आपल्या कारखान्यात रेल्वेने या दिशेने काम सुरू केले

राजीव मुळ्ये-बेळगावात मराठी नाट्य संमेलन आयोजित करीत असताना कर्नाटकाच्या पोलिसांनी लादलेल्या जाचक अटी ही घटनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी केली. शरद पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ शब्द का गिळला, असा सवालही त्यांनी यावेळी केला.९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे सूप रविवारी सायंकाळी वाजले. समारोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना रावते यांनी अपेक्षेप्रमाणे मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरला. मराठी माणसाचा हुंकार थांबविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केला असून, मराठी माणूस कधीच झुकणार नाही. एका राज्याच्या मंत्र्याला दुसऱ्या राज्यात दौरा करताना त्या राज्याकडून मिळणाऱ्या सेवा या दौऱ्यात आपण नाकारल्या आहेत, असे रावते यांनी जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.संमेलन नगरीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ते म्हणाले, ‘‘कलावंतांच्या सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना संमेलनाच्या उद्घाटनावेळी आठवले; परंतु गेली १५ वर्षे त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांनी काय केले? स्व:त:चे पाकीट शाबूत ठेवून दुसऱ्याच्या खिशात हात घालण्याची सवय असली की असेच होते’’, असा टोलाही त्यांनी लगावला.सात दिवसांत सात नाटकांचा महोत्सव करण्याची परंपरा ग्रामीण भागात पोहोचविता येईल का, याचा रंगकर्मींनी विचार करावा, शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही रावते यांनी दिले. भाषणाच्या शेवटी हुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांना दोन मिनिटे उभे राहण्याची विनंती त्यांनी केली. तसेच अखंड, संपूर्ण जय महाराष्ट्र, असा घोष करून भाषणाची सांगताकेली. कारवाईच्या भीतीने उद्धवची दांडी?महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून काही बोलाल तर कारवाई करु, असा इशारा कर्नाटक पोलिसांनी दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेळगावला जाण्याचे टाळले, अशी चर्चा शिवसेनेच्याच वर्तुळात सुरु आहे. / वृत्त ५‘जय महाराष्ट्र’ का वगळले : पवार यांच्या भाषणाचा ‘बाईट’ माझ्याकडे असून, भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद’ म्हटल्यावर ‘जय महाराष्ट्र’ जाणीवपूर्वक का वगळले, असा सवाल त्यांनी केला. त्याचसोबत ‘जय कर्नाटक’ म्हटले तरी चालले असते, असेही त्यांनी नमूद केले.