बाडमेर : राजस्थानच्या सीमावर्ती बाडमेर जिल्ह्यातील बायुत ठाण्यांतर्गत पोलिसांनी रविवारी स्फोटकांचा २० टन साठा जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालक आणि वाहकास अटक करण्यात आली.एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. बायुत ठाण्यापासून सुमारे २० किमी दूर नोसर गावात एका ट्रकची झडती घेतली असता त्यात स्फोटके आढळली. या ट्रकमधून बंदी असलेल्या अमोनियम नायट्रेट या स्फोटकाची ४०५ पोती जप्त करण्यात आली. उदयपूरवरून ईशराराम येथे ही स्फोटके चालली होती. प्राथमिक चौकशीत अवैध खाणकामासाठी ही स्फोटके नेण्यात येत असल्याची कबुली आरोपींनी दिली.
राजस्थानात २० टन स्फोटके जप्त
By admin | Updated: January 25, 2016 01:48 IST