शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय लष्करानं प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून 20 दहशतवाद्यांचा केला खात्मा ?

By admin | Updated: September 24, 2016 04:15 IST

भारतीय लष्कराच्या एका स्पेशल टीमनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे

ऑनलाइन लोकमत,

नवी दिल्ली, दि. 22 - उरी हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारतीय लष्करानं आता मोहीम उघडली आहे. भारतीय लष्कराच्या एका स्पेशल टीमनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे, असं वृत्त द क्विन्ट या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. मात्र केंद्र सरकार, लष्कराच्या कोणत्याही प्रवक्त्यांकडून याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. या हल्ल्यात आतापर्यंत 20 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. भारतीय लष्कराच्या दोन पॅरा फोर्सनं हा हल्ला केला आहे. भारतीय लष्कराच्या दोन गटांमध्ये विभागलेल्या या पॅरा फोर्समध्ये जवळपास 18 ते 20 जवान असल्याचं समजतं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तीन तळ उद्ध्वस्त करून 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या हल्ल्यात 200हून अधिक दहशतवादी जखमी झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येते आहे. लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचा दावा द क्विन्ट या वृत्तसंस्थेनं केला आहे. मात्र केंद्र सरकार, लष्कराचा कोणत्याही सूत्रांकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. क्विन्टच्या माहितीनुसार, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीएआय)नं उत्तर पाकिस्तानमधल्या शहरांमधून विमानसेवाही रद्द केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधली गिलगिट आणि स्कर्डू या शहरांची सेवा याच कारणास्तव खंडित केल्याची माहिती क्विन्टनं दिली आहे.