शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

२ खून, आत्महत्या; पोलीसही चक्रावले, पत्नी, सासूच्या हत्येनंतर त्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 2:15 AM

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये वेगळी राहत असलेल्या पत्नीची हत्या केली होती. या प्रकरणाने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

कोलकाता : कोलकात्यामध्ये एकाने आपल्या सासूची हत्या केली व नंतर आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये वेगळी राहत असलेल्या पत्नीची हत्या केली होती. या प्रकरणाने पोलीसही चक्रावून गेले आहेत. अमित अग्रवाल (४२), याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले होते की, त्याने बंगळुरूमध्ये पत्नी शिल्पीची हत्या केली होती व नंतर सोमवारी तो कोलकाता येथे आला होता. तेथे आपल्या मुलाला भावाच्या घरी सोडून तो फूलबाग भागातील सासुरवाडीत भेटण्यासाठी आला होता. तेथे त्याने ६० वर्षीय सासूची हत्या केली होती. यावेळी त्याचे सासरे तेथून कसेबसे पळून जाण्यात यशस्वी झाले व त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अमित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याने हत्या व आत्महत्येसाठी वापरलेले शस्त्रही जमिनीवर पडले होते.बंगळुरूमध्ये व्हाईटफील्ड फ्लॅटमध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह मिळाला होता व तो नष्ट होण्याच्या अवस्थेत होता. मृतदेह पोलिसांना मिळण्यापूर्वी ४८ तास आधी तिचा खून झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. या हत्येच्या वेळी अमित नेमका कोठे राहत होता, याचाही पोलीस तपास करीत आहेत.प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, अग्रवाल दाम्पत्य दोन वर्षांपूर्वी वेगळे राहिले होते व त्यांचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. दोघेही चार्टर्ड अकाऊंटंट होते.