शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

माल्दामधून 2000 रुपयांच्या 2 लाखांच्या बनावट नोटा जप्त

By admin | Updated: February 17, 2017 16:51 IST

बीएसएफनं दोन हजार रुपयांच्या दोन लाखांच्या बनावट नोटा पश्‍चिम बंगालमधील माल्दा जिल्ह्यातून पकडल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतपश्चिम बंगाल, दि. 17 - बीएसएफनं दोन हजार रुपयांच्या दोन लाखांच्या बनावट नोटा पश्‍चिम बंगालमधील माल्दा जिल्ह्यातून पकडल्या आहेत. भारत-बांगलादेश सीमेवरून या बनावट नोटा पश्चिम बंगालमार्गे भारतात येत असतानाच बीएसएफनं ही कारवाई केली आहे. बीएसएफच्या माहितीनुसार, चुरियांतपूर येथे या बनावट नोटांची तस्करी होत असल्याची माहिती बीएसएफला मिळाली. त्यानंतर लागलीच त्यांनी सापळा रचला. त्यावेळी भारताकडून काही तस्कर बांगलादेशच्या सीमेपलीकडून संशयास्पदरीत्या वस्तूंची देवाणघेवाण करत असल्याचं आढळून आले. बीएसएफच्या जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पॅकेट तेथेच टाकून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला.

तत्पूर्वी नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारत आणि बांगलादेश सीमेवरील माल्दा आणि मुर्शिदाबादेत 2 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. 8 फेब्रुवारीला पश्चिम बंगालच्या पोलिसांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या एका तरुणाकडून 2 हजार रुपयांच्या 40 बनावट नोटा जप्त करून त्याला अटक केली होती. 2 हजारांच्या जप्त करण्यात आलेल्या नोटांवर वॉटरमार्कसह फीचर्स कॉपी करण्यात आले आहेत. त्यामुळे या नोटा ओळखणं अवघड जातं असल्याचंही बीएसएफच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे.