शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटींसाठी २ लाख कोटींची गुंतवणूक होणार

By admin | Updated: May 1, 2015 01:39 IST

भारतात येत्या पाच वर्षांत शहर विकासासाठी किमान दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

नवी दिल्ली : भारतात येत्या पाच वर्षांत शहर विकासासाठी किमान दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या एकूण गुंतवणुकीच्या निम्मी गुंतवणूक ही राज्ये आणि स्थानिक संस्थांची असेल, असे केंद्रीय नगरविकास व गृहनिर्माण मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी सांगितले. ते आॅल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनने आयोजित केलेल्या नॅशनल लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये मुख्य भाषणात बोलत होते.केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सरकारचा महत्त्वाकांक्षी १०० स्मार्ट सिटीज् प्रकल्प आणि नगरोत्थान प्रकल्पाला मान्यता दिली. या दोन्हींचा एकूण खर्च हा सुमारे एक लाख कोटी रुपये आहे. किमान दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या पाच वर्षांमध्ये नागरी भागाच्या विकासासाठी केली जाईल व राज्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्था ५० ते ६६ टक्क्यांपर्यंतची गुंतवणूक त्यात करतील, असे नायडू म्हणाले. ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये स्थलांतरित होणाऱ्यांचे दैनंदिन जीवन सरकारच्या या पुढाकारामुळे सुखमय होईल, असेही नायडू म्हणाले. नागरीकरण ही वस्तुस्थिती असून ती आता मागे रेटता येणार नाही. ग्रामीण भागातून लोक शिक्षण, रोजगार, करमणूक, आर्थिक संधी आणि विकसित आरोग्यसेवेसाठी शहरांमध्ये स्थलांतर करीत असून या सगळ्या सोयी शहरांमध्येच केंद्रित झाल्या आहेत. म्हणून आम्ही लोकांचे शहरातील जगणे सुखावह, जगण्यायोग्य व उपयोगी बनवीत आहोत, असेही ते म्हणाले.शहरी भागांमध्ये प्रदूषण, अतिक्रमणे, दाट वस्ती आणि प्रशासनाचा गोंधळ आहे. आम्हाला नागरी जीवन नव्याने चैतन्यमय बनवायचे असून तेथे प्रशासन सक्रिय करायचे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)४स्मार्ट सिटीज विकसित करण्यासाठी अनेक देशांनी उत्सुकता दाखविली असली तरी लोकांच्या सहभागाशिवाय व संमतीशिवाय कोणतीही योजना तयार केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांच्या खर्चासाठी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी आणि खासगी भागीदारीतून खासगी गुंतवणुकीला चालना देतील.४स्थावर मालमत्ता (दुरुस्ती) विधेयकाच्या संमतीबद्दल बोलताना नायडू यांनी सांगितले की, आमच्याकडे बहुमत नाही. मी लोकांशी बोलतो आहे; परंतु स्थावर मालमत्ता विधेयक लवकरात लवकर संमत झाले पाहिजे. येत्या काही दिवसांत आम्ही ते समोर आणू.