शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

१९ दिवसात कोषागारकडे अडीच हजारावर बिले मार्च एण्डिगची धावपळ : शासनाच्या सुधारित आदेशाने झाला भार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 00:24 IST

जळगाव : मार्च महिन्याच्या अखेरीस विविध कार्यालयांतर्फे बिले काढण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे बिलांच्या मागणीच्या देयकांचा पाऊस पडत आहे. १९ दिवसात तब्बल दोन हजार ६०६ देयक या कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे.आगामी तीन दिवसात किमान एक हजार ते १२०० बिले येण्याची शक्यता आहे.

जळगाव : मार्च महिन्याच्या अखेरीस विविध कार्यालयांतर्फे बिले काढण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे बिलांच्या मागणीच्या देयकांचा पाऊस पडत आहे. १९ दिवसात तब्बल दोन हजार ६०६ देयक या कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे.आगामी तीन दिवसात किमान एक हजार ते १२०० बिले येण्याची शक्यता आहे.
शासकीय कार्यालयांकडून बिलांसाठी धावपळ
मार्च महिना अखेर आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात धावपळ सुरू आहे. कर्मचार्‍यांचे पगार, प्रवास भत्ते तसेच अन्य बिले तयार करून ते मंजूर करून घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बसून काम पूर्ण केले जात आहे. तयार बिल मंजुरीसाठी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहे. मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून बिलांच्या अर्जांचा पाऊस पडत आहे.
वर्षभरात आली २६ हजार देयके
जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे १ एप्रिल २०१५ ते २३ मार्च २०१६ पर्यंत शासकीय कार्यालयांकडून २६ हजार १०३ देयके प्राप्त झाली आहेत. यात मार्च महिन्याच्या १९ दिवसात तब्बल दोन हजार ६०६ देयके प्राप्त झाली आहेत.
सुधारित आदेशाने झाला भार कमी
मार्च महिन्याच्या अखेरीस कोषागार कार्यालयात सादर होणार्‍या देयकांची संख्या नियंत्रित करण्यासंदर्भात शासनाने १० मार्च रोजी आदेश काढला आहे. त्यात प्रवास भत्ता, आस्थापना विषयक पुरवणी देयके, वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके १५ मार्चपर्यंत कोषागार कार्यालयाकडे सादर करण्याची सूचना केली आहे. २०१५/१६ चे सुधारित अंदाज मान्य झाल्यानंतर वजा अनुदानावरील देयके कोषागारात पारीत करणार नसल्याचे या आदेशात म्हटले आहे. या निर्णयामुळे १५ मार्चपर्यंत प्रवास भत्ता, पुरवणी देयके तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके आल्याने मार्च महिन्याच्या अखेरीस येऊन पडणारे बिले आणि कामाचा अतिरिक्त ताण कमी झाला आहे.
पोलीस व महसूलची सर्वाधिक बिले
जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे पोलीस प्रशासन, जिल्हा महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, उच्च शिक्षण विभाग तसेच पे-युनिट (माध्यमिक व प्राथमिक) या कार्यालयातील सर्वाधिक बिलांचा समावेश आहे. १४ व १५ मार्च रोजी या कार्यालयांकडून प्रवास भत्ता, पुरवणी देयके तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांची सर्वाधिक बिले जिल्हा कोषागार कार्यालयाकडे प्राप्त झाले.