१९... गुन्हे... जोड
By admin | Updated: February 20, 2015 01:09 IST
वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
१९... गुन्हे... जोड
वाहनाच्या धडकेत पादचारी ठारडोंगरगाव शिवारातील अपघात : वाहनचालकाचा शोध सुरूनागपूर : भरधाव वाहनाने रोडच्या कडेने पायी जाणाऱ्या पादचाऱ्यास उडविले. यात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव शिवारात सोमवारी सकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.दिवाकर बाबूराव चचाने (५५, रा. डोंगरगाव, ता. कुही) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. दिवाकर हा रोडच्या कडेने पायी जात असताना त्याला अज्ञात भरधाव वाहनाने उडविले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी कुही पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.*** वृद्धाचा मृतदेह आढळलाकुही : कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकोली शिवारात सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. गणेश रामचंद्र गाढवे (६०, रा. आकोली, ता. कुही) असे मृताचे नाव आहे. गणेश गाढवे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या आकोली शिवारातील शेतात गेले होते. दरम्यान, रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे कळू शकले नाही. या प्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. ***येरखेडा येथे घरफोडीनागपूर : कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू येरखेडा येथे घरफोडी झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. फिर्यादी नविता जितेंद्र तिरपुडे (३६, न्यू येरखेडा, ता. कामठी) या बाहेरगावी गेल्याने घरी कुणीही नव्हते. चोरट्यांनी हीच संधी साधून घराच्या दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. यात चोरट्यांनी आलमारीत ठेवलेले तीन हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी कामठी पोलिसांनी भादंवि ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ***