शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससीच्या आयईएस परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा दबदबा; पटकावल्या 32 पैकी 18 जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 11:01 IST

जेएनयूच्या विद्यार्थ्यांचं आयईएस परीक्षेत नेत्रदीपक यश

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) भारतीय अर्थशास्त्र सेवेसाठी (आयईएस) पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. सध्या हिंसाचार आणि आंदोलनामुळे चर्चेत असलेल्या नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या १८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत देदीप्यमान यश मिळवलं आहे. भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचाच बोलबोला पाहायला मिळाला आहे. भारतीय अर्थशास्त्र सेवेत देशस्तरावर केवळ ३२ जागा असतात. यातल्या १८ जागा जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी पटकावल्या आहेत. यामुळे जेएनयूतल्या शिक्षणाचा दर्जा इतर विद्यापीठांपेक्षा उत्तम असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ५ जानेवारीला जेएनयूमध्ये हिंसाचार झाला. विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली. यावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. जेएनयूमध्ये तुकडे तुकडे गँग सक्रिय असल्याचा आरोप भाजपा आणि अभाविपनं केला आहे. तर जेएनयूला सर्वोत्तम विद्यापीठ गौरवणारं सरकार दुटप्पीपणानं वागत असून विद्यापीठाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप डाव्यांनी केला आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनांवर उजव्या संघटना टीका करत असताना दुसऱ्या बाजूला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलं आहे.  

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग