शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१८... अपघात

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
खापा : भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खैरी (पंजाबराव) शिवारात बुधवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.
शंतनू विकास बुरडे (२१, रा. खापा, ता. सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. शंतनू हा एमएच-४०/झेड-१६०२ क्रमांकाच्या मोटरसायकलने खाप्याहून खैरीकडे जात होता. दरम्यान, खैरी गावानजीक भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला उडविले. यात तो गंभीर जखमी झाला. तो जखमी अवस्थेत बराच वेळ रोडवर पडून होता. मात्र, येणाऱ्या - जाणाऱ्यांपैकी कुणीही त्याला मदत केली नाही. त्यामुळे काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात नागरिकांनी खापा पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच खापा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. या प्रकरणी खापा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
***
वृद्धाचा मृतदेह आढळला
नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव परिसरात मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास वृद्धाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
मुठ्ठीलाल समरा बहादूर (६०, रा. व्याहाडपेठ) असे मृताचे नाव आहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे कळू शकले नाही. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
***
विहिरीत पडून तरुणाचा मृृत्यू
नागपूर : विहिरीत पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकोली येथे मंगळवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली.
रवींद्र श्रावण तिजारे (३२, रा. आकोली, ता. कुही) असे मृत तरुणाचे नाव आहे. रवींद्र हा गावातील विहिरीत पडला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. तो विहिरीत नेमका कसा पडला, हे कळू शकले नाही. या प्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
***