१७... यात्रा... रामटेक
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
रामटेक
१७... यात्रा... रामटेक
रामटेकरामटेक शहर व पंचक्रोशीतील शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शिवमंदिरात भगवान शंकराला अभिषेक करून पूजा करण्यात आली. द्वादश ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. तालुक्यातील घोगरा येथील मोठा महादेव, खुमारी येथील लहान महादेव, नगरधन येथील कोटेश्वर मंदिर तसेच शहराच्या सभोवताल असलेल्या दक्षिणामूर्ती, तिळभांडेश्वर, पापधुपेश्वर, पाताळेश्वर, धूम्रेश्वर, रामाळेश्वर, जगन्नाथेश्वर, नंदेश्वर आणि नागार्जुन या प्राचीन ज्योतिर्लिंगांची पूजाअर्चना करण्यात आली. मनसर येथील रामधाममध्ये चित्रकूट पर्वताची प्रतिकृती साकारली आहे. या चित्रकूट पर्वताच्या गुहेत दुसऱ्या माळ्यावर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती मांडण्यात आलेल्या आहेत. हजारो भाविकांनी येथे १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले. बाबा बर्फानीच्या कपाटाचे दार शिवरात्रीला बंद करण्यात आले. दार बंद होण्यापूर्वी भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले. ***