१७... यात्रा... मोवाड
By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST
मोवाड
१७... यात्रा... मोवाड
मोवाडस्थानिक वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या जागृतेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महापूजा करण्यात आली. दरम्यान, मोवाड येथील जागृतेश्वर मंदिरापर्यंत कलश व शोभायात्रा काढण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या परिसरातून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यात परिसरातील दिंडी, बॅन्ड पथक व भजन मंडळ तसेच शेकडो भाविक सहभागी झाले होते. भाविकांसाठी चहा, फराळ, पाणी, सरबत आदींची व्यवस्था केली होती. मंदिरात दर्शनासाठी सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ***