शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाने आकारले १७ लाखांचे बिल!, मुलाने केली पोलीस तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 05:27 IST

शस्त्रक्रियेतील हेळसांडीमुळे आईचा मृत्यू झाल्याचा आरोप करणारी तक्रार एकाने पोलिसांकडे केली आहे

गुरगाव : शस्त्रक्रियेतील हेळसांडीमुळे आईचा मृत्यू झाल्याचा आरोप करणारी तक्रार एकाने पोलिसांकडे केली आहे. या शस्त्रक्रियेसाठी येथील खासगी रुग्णालयाने १७ लाख रुपयांचे बिल त्याला आकारले आहे. गेल्या महिन्यात शस्त्रक्रियेनंतर १८ दिवसांनी महिलेचा मृत्यू झाला.पोलिसांनी तक्रार घेतली असली तरी गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय आरोग्य विभागाकडून चौकशी होऊन त्याचा अहवाल आल्यावरच होणार आहे. सावित्री देवी या मूळच्या अलवार (राजस्थान) येथील. त्यांना ८ जानेवारी रोजी येथील कोलंबिया एशिया रुग्णालयात दाखल केले गेले. माझ्या आईच्या पित्ताशयातील खडे काढण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक होती, असा दावा त्यांचा मुलगा राजेंद्र सिंह याने केला. दुसºया दिवशी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. रुग्णालयाने मात्र आम्ही अशी कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही, असे म्हटले. कोलंबिया एशियाचे महाव्यवस्थापक डॉ. चैतन्य पठाणिया म्हणाले की, सावित्री देवी यांच्यावर आॅगस्ट २०१७मध्ये दुसºया रुग्णालयात पित्ताशयातील खडे काढण्यासाठी शस्त्रक्रिया झाली होती. तेथे खडे काढण्यातही आले. आमच्या रुग्णालयात त्यांना सामान्य पित्त नलिकेतील खडे काढण्यासाठी दाखल केले होते. माझ्या आईला ९ जानेवारी रोजी शस्त्रक्रियेनंतर पोटात वेदना झाल्या. आणखी तपासण्या केल्यावर तिच्या आतड्यांची हानी झाल्याचे उघड झाले, असा आरोप राजेंद्र सिंह यांनी केला. त्यानंतर रुग्णालयाने सावित्री देवी यांच्यावर आणखी तीन शस्त्रक्रिया केल्या व त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. सावित्री देवी यांचा २६ जानेवारी रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला.राजेंद्र सिंह याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत रुग्णालयाने उपचारांसाठी१७ लाख रुपये बिल आकारल्याचा आरोप केला. आम्हाला तक्रार मिळाली असून, ती मुख्य वैद्यकीय अधिकाºयांकडे पाठवली आहे. आम्हाला आरोग्य विभागाकडून अहवाल मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय होईल, असे पालम विहार पोलीस ठाण्याच्या अधिकाºयाने सांगितले.