शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बचाव कार्यासाठी १६० श्वान

By admin | Updated: February 8, 2016 03:50 IST

भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आता १६२ प्रशिक्षित श्वानांची तुकडी तयार करीत आहे

नवी दिल्ली : भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आता १६२ प्रशिक्षित श्वानांची तुकडी तयार करीत आहे. अशाप्रकारे बचाव कार्यासाठी प्रशिक्षित श्वान पथक तयार केले जाण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि चेन्नईत आलेला पूर आणि गेल्या वर्षी नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर बचाव कार्यात सामील असलेल्या एनडीआरएफने श्वान तुकडी तयार करण्याच्या कामाला ‘मिशन मोड’वर प्रारंभ केला आहे. एनडीआरएफ आपल्या अर्बन सर्च अ‍ॅण्ड रेस्क्यू (युएसएआर) कार्यासाठी अश १६२ श्वानांना प्रशिक्षण देत आहे. ‘सामान्यपणे पोलीस दलात असलेल्या आणि ट्रॅकर श्वानांपेक्षा हे श्वान जरा वेगळे आहे. हे श्वान मलबा हुंगून लगेच त्याखाली कुणी दबलेला आहे की नाही, हे सूचित करतात. एनडीआरएफने या विशेष प्रकारच्या श्वानांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी घेतली आहे,’ असे एनडीआरएफचे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)मलब्याखाली दबलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची क्षमता असलेल्या या श्वानांमध्ये लॅब्रेडोर आणि जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानांचा समावेश आहे. मलब्याखाली दबलेल्यांचा शोध घेण्याची क्षमता बचाव कार्यात सामील असलेल्या माणसांपेक्षा श्वानांमध्ये अधिक प्रमाणात असते, असे आमच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच आम्ही हे श्वान पथक तयार करण्याचे ठरविले आहे, असे सिंग म्हणाले.