१६... सारांश... जोड
By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST
कुष्ठरोग नियंत्रण सप्ताहाची सांगता
१६... सारांश... जोड
कुष्ठरोग नियंत्रण सप्ताहाची सांगताकाटोल : अनसूया माता आरोग्य सेवा समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कुष्ठरोग निवारण जनजागृती अभियानाचा समारोप करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना कुष्ठरोगाबाबत माहिती देण्यात आली. या रोगाबाबतचे गैरसमज व उपचारावरही मार्गदर्शन करण्यात आले. ***उमरेड येथे शिवजयंती महोत्सव उमरेड : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी सत्यम् सभागृहात शिवजयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त मोटरसायकल रॅली व व्याख्यानाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.*** लाईनमन नियुक्त करण्याची मागणी गुमथळा : नजीकच्या वडोदा येथे ११ लाईनमनची नियुक्ती असून, त्यातील चार लाईनमन कार्यरत आहेत. यातील एक जण सेवानिवृृत्त होत आहे. या रिक्त पदांमुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यात विलंब होत असल्याने येथे लाईनमनची त्वरित नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ***नाल्यांचे खोलीकरण करण्याची मागणीकुही तालुक्यातील बहुतांश नाले बुजलेले आहेत. त्यामुळे पुराचे पाणी लगतच्या शेतातून वाहत असल्याने पिकांचे व शेतांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने नाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे खोलीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ***