१६... खापा...
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
(फोटो)
१६... खापा...
(फोटो)प्रकटदिन व पालखी महोत्सवाची सांगताखापा येथे आयोजन : शेकडो भाविकांचा सहभागखापा : स्थानिक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री संत गजानन महाराज प्रकटदिन आणि श्री संत ताजुद्दीनबाबा यांच्या पालखी महोत्सवानिमित्त श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी पंडित विष्णुकांत शास्त्री यांनी कथावाचन केले. सप्ताहाच्या काळात मंगल शहनाई वादन, काकडा आरती, अभिषेक, पारायण, कलशस्थापना, हरिपाठ यासह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी श्री संत गजानन महाराज व श्री संत ताजुद्दीनबाबा यांची पालखी यात्रा काढण्यात आली. यात स्थानिक राजेंद्र विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी दांडिया सादर केला. शिवाय नरेंद्र महाराज सत्संग सेवा मंडळ व सौंसर येथील संतकृपा दिंडी मंडळाचे चित्ररथ सहभागी करण्यात आले होते. जामसावळी येथील श्री हनुमानाजीच्या मूर्तीची प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र ठरली. या पालखी यात्रेत रामटेक, पारशिवनी, कोथूर्णा, बडेगाव, सावनेर, केळवद, कळमेश्वर, खापरखेडा, पाटणसावंगी, वाकोडी, गुमगाव, मध्य प्रदेशातील सौंसर येथील दिंडी पथक व भजन मंडळ सहभागी झाले होते. या पालखी यात्रेची सुरुवात मंदिराच्या आवारातून करण्यात आली. शहरातील विविध मार्गाने भ्रमण करीत ही यात्रा मंदिराच्या परिसरात आली. तिथे यात्रेचा समारोप करण्यात आला. दरम्यान, ठिकठिकाणी यात्रेतील सहभागी भाविकांचे स्वागत करण्यात आले. पिण्याचे पाणी, सरबत यांचे वितरण करण्यात आले. यशस्वितेसाठी स्थानिक बाल गणेश मंडळाचे सदस्य, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पंचकमिटीतील सदस्य आणि भाविकांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)***