शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

देशात मिनिटाला १५ आत्महत्या !

By admin | Updated: July 20, 2015 01:50 IST

गतवर्षी देशात दर मिनिटाला १५ व्यक्तींनी आत्महत्या करून आयुष्य संपवले. सन २०१४ मध्ये देशभरात एकूण १.३१ लाख लोकांनी आत्महत्या केली.

नवी दिल्ली : गतवर्षी देशात दर मिनिटाला १५ व्यक्तींनी आत्महत्या करून आयुष्य संपवले. सन २०१४ मध्ये देशभरात एकूण १.३१ लाख लोकांनी आत्महत्या केली. या वर्षात देशातील विविध राज्यांपैकी महाराष्ट्रात आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या, तर शहरांमध्ये चेन्नईत सर्वाधिक आत्महत्या झाल्या.राष्ट्रीय गुन्हे नोंदणी शाखेच्या (एनसीआरबी) अहवालातून हे वास्तव समोर आले आहे. अहवालानुसार सन २०१४ मध्ये महाराष्ट्रात आत्महत्येच्या १६,३०७ घटना घडल्या. या पाठोपाठ तामिळनाडूत १६,१२२ आाणि पश्चिम बंगालमध्ये अशा १४,३१० घटना घडल्या. टक्केवारीत सांगायचे तर महाराष्ट्रात गतवर्षी सर्वाधिक म्हणजे १२.४ टक्के, तर तामिळनाडू आणि प. बंगालमध्ये अनुक्रमे १२.२ आणि १०.९ टक्के आत्महत्या घडल्या. आत्महत्या केलेल्या ६९.७ टक्के लोकांचे वार्र्षिक उत्पन्न एक लाखापेक्षाही कमी होते. याशिवाय जीवन संपविणाऱ्या प्रत्येक सहापैकी एक गृहिणी होती, असेही या अहवालातून उघड झाले आहे.सर्वाधिक अपघाती मृत्यू राज्यातराज्यातील रस्ते अधिकाधिक असुरक्षित बनत असल्याचे चित्र राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून निर्माण होत आहे. २०१४ या वर्षात देशभरातील रस्ते अपघातात तब्बल १.४ लाख लोकांचे बळी गेले आहेत आणि त्यापैकी सर्वाधिक बळी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत गेले आहेत. वर्षभरात देशात झालेल्या एकूण ४.५ लाख अपघातांपैकी सर्वाधिक अपघात झालेल्या राज्यांच्या यादीतही महाराष्ट्राचा समावेश आहे.२०१३ च्या तुलनेत गेल्या वर्षी रस्ते अपघातात ३ टक्के अधिक लोकांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी रस्ते अपघातात तब्बल ४.८ लाख लोक जखमी झाले आहेत. वेगाने आणि धोकादायकरित्या वाहाने हाकणे, हे वाढत्या अपघातांमागील प्रमुख कारण आहे. तसेच मोटारसायकल आणि ट्रक-लॉरी यांचा सहभाग असलेल्या अपघातांचे प्रमाण एकूण अपघातांच्या निम्मे आहे. दुचाकीच्या अपघातांत १३,७८७ चालक ठार झाले आहेत, तर २३,५२९ अन्य लोक बळी पडले आहेत.