शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जुगार खेळणार्‍या १५ जणांना अटक, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: December 31, 2014 19:00 IST

शेवगाव तालुक्यातील गदेवाडी शिवारात एका शेतातील जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकला. यामध्ये १५ जणांना अटक करण्यात आली आहे. जुगाराच्या साहित्यासह सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील गदेवाडी शिवारात एका शेतातील जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकला. यामध्ये १५ जणांना अटक करण्यात आली आहे. जुगाराच्या साहित्यासह सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शेवगाव तालुक्यात गदेवाडी शिवारात रमेश नागू धनवडे यांच्या शेतातील शेततळ्यालगतच्या झाडाखाली जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना मिळाली होती. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी विशेष पथक नियुक्त करून मंगळवारी रात्री अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात १५ जणांना अटक केली. रमेश निवृत्ती दुधाडे ( रा. शेवगाव), रामकिसन नारायण कुर्‍हाडे (रा. गदेवाडी), अनिल लक्ष्मण भोंगळे (रा. बोधेगाव), अनिल एकनाथ धनवडे (रा. गदेवाडी), फिरोजखान असिमखान पठाण (रा. पैठण). काकासाहेब अण्णासाहेब मार्कंडेय (रा.पैठण), विष्णू पुंजा गायकवाड (रा. पाथर्डी), कांताराम सीताराम पाचे (रा. पैठण), अरुण बबनराव म्हस्के (रा.पैठण), सोमनाथ गोरख मडके (रा.गदेवाडी), नारायण बन्सी पाखरे (रा. शेवगाव), कैलास द्वारका अंधारे (रा. बोधेगाव), कमरुद्दिन दगडू शेख (रा. बालमटाकळी), हरिभाऊ विठ्ठल सुपारे (रा. शेवगाव), रमेश भागू धनवडे ( रा. गदेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या जुगार्‍यांकडे २ लाख ७७ हजार ५८० रुपये रोख मिळाले. ३ लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी, ३८ हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल असा माल हस्तगत केला. जुगाराच्या साहित्यासह जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ६ लाख १५ हजार ५८० एवढी आहे. वर्षभरातील जुगार अड्ड्यावर झालेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.