१५.... पारशिवनी... अपघात
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
अपघात नसून घातपाताचा संशय
१५.... पारशिवनी... अपघात
अपघात नसून घातपाताचा संशयनातेवाइकांची पोलिसांत तक्रार : रवींद्र ठाकूर यांचा अपघातात मृत्यूपारशिवनी : पारशिवनी-सावनेर मार्गावरील करंभाड परिसरात रवींद्र ठाकूर रा. पालासावळी, ता. पारशिवनी यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. मात्र, त्यांचा मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याचा संशय मृताच्या नातेवाइकांनी व्यक्त केला असून, यासंदर्भात पारशिवनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पारशिवनी-सावनेर मार्गावरील करंभाड शिवारात रवींद्र ठाकूर यांचा मृतदेह मंगळवारी (दि.१०) रात्री ७ ते ८ वाजताच्या दरम्यान रोडवर पडला असल्याचे आढळून आले होते. रवींद्र ठाकूर हे नेटसर्फ कम्युनिकेशनमध्ये मार्केटिंगचे काम करायचे. ते मंगळवारी केळवद परिसरात कंपनीच्या बैठकीला गेले होते. दरम्यान, अनोळखी व्यक्तीचा फोन आल्याने ते बैठक सोडून निघून आले. त्यांचे काही व्यक्तींशी आर्थिक व्यवहारातून २५ डिसेंबर २०१४ रोजी भांडण झाले होते. त्यात संबंधित व्यक्तींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती, असेही तक्रारीत नमूद केले आहे.त्यांचा मृतदेह करंभाडपासून एक कि.मी. अंतरावर आढळून आला. त्यांची मोटरसायकल रोडच्या कडेला पडलेली होती. त्यांच्याजवळील बॅगमध्ये असलेल्या डायरीवर रक्ताचे डाग आढळून आले. त्यांचा चष्मा, पेन कुठेही आढळून आला नाही, शिवाय त्यांच्या शर्टच्या खिशाला पेनाचे टोपन लटकलेले होते. पारशिवनीचे ठाणेदार दिलीप मेश्राम हे घटनास्थळी पोहोचले त्यावेळी ठाकूर यांचा मोबाईल सुरू होता. त्यामुळे त्यांचा इतरत्र खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशााने मृतदेह करंभाड शिवारात फेकला असावा, अशी शक्यताही नातेवाइकांनी व्यक्त केली. सदर घटनेची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणीही ठाकूर यांच्या नातेवाइकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)***