बळवंत पतसंस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश
By admin | Updated: September 11, 2015 21:24 IST
जळगाव : बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १५ टक्के दराने लाभांश जाहीर करण्यात आला आहे. संस्थेची १५ वी वार्षिक सभा मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडली.
बळवंत पतसंस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश
जळगाव : बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १५ टक्के दराने लाभांश जाहीर करण्यात आला आहे. संस्थेची १५ वी वार्षिक सभा मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडली.सभेच्या सुरुवातीला संस्थेने ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा सत्कार केला. तसेच सभासदांच्या गुणवान पाल्यांचा गौरवही केला. संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला. सभासदांसाठी यंदापासून शैक्षणिक कर्ज योजना, गृहपयोगी वस्तुंसाठी तसेच पर्यटनासाठी कर्ज योजना सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष अरविंद दहाड, संस्थापक अध्यक्ष सतीश मदाने, गोविंद मोरे, चंदूलाल नेवे, विनोद पाटील, कुमुद नारखेडे, मंगला जकातदार, डॉ.आरती हुजूरबाजार, सहकारभारतीचे प्रदेशाध्यक्ष संजय बिर्ला, संस्थेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद मोघे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे प्र्रमुख भरत अमळकर, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, रत्नाकर पाटील उपस्थित होते. सूत्रसंचलन सचिन बोरसे व सुनील याज्ञिक यांनी केले. तर आभार विनोद पाटील यांनी मानले.