शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटींची वसुली मात्र सुविधांची बोंब वीज सर्वाधिक महाग : सुविधा पुरविण्याची जबाबदारी नाही निश्चित

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

जळगाव : औद्योगिक वसाहत क्षेत्रात नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची दुरुस्ती व अन्य सुविधा पुरविण्यासंदर्भात नेमकी जबाबदारी कुणाची आहे. यावर निश्चित तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जळगाव औद्योगिक वसाहतीतून कराच्या स्वरुपात १५ कोटींची वसुली झाली असली तरी सुविधांच्या नावाने मात्र ठणठण गोपाळा अशी स्थिती आहे.

जळगाव : औद्योगिक वसाहत क्षेत्रात नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची दुरुस्ती व अन्य सुविधा पुरविण्यासंदर्भात नेमकी जबाबदारी कुणाची आहे. यावर निश्चित तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जळगाव औद्योगिक वसाहतीतून कराच्या स्वरुपात १५ कोटींची वसुली झाली असली तरी सुविधांच्या नावाने मात्र ठणठण गोपाळा अशी स्थिती आहे.

जबाबदारी निश्चितीसाठी शासनाचे मार्गदर्शन मागविले
जळगाव औद्योगिक वसाहत क्षेत्रामध्ये नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची नियमित देखभाल करणे, नवीन पथदिवे बसविणे, पथदिव्यांची नियमित देखभाल करणे, पक्क्या गटारी तयार करणे तसेच नियमित साफसफाई करणे या मुलभूत सुविधांचा वानवा आहे. या सुविधा पुरविण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे याबाबत संभ्रम आहे. या संदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योग मंत्रालयाचे प्रधान सचिव यांना पत्र पाठवून धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत जिल्हा उद्योग मित्र समितीच्या सभेत देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

२५० हेक्टर जागेचा प्रस्ताव केला होता रद्द
शहरातील एमआडीच्या विस्तारासाठी तत्कालीन उद्योगमंत्र्यांकडे जिल्हाधिकार्‍यांमार्फत शहरातील सुप्रीम कॉलनी मागील २५० हेक्टर जागेबाबात आराखडा सादर करण्यात आला होता. मात्र तो आराखडा महागडा असल्याचे कारण दाखवून तो सरकारकडून रद्द करण्यात आला होता. आता नवीन सरकारकडे पुन्हा हा प्रस्ताव सादर करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात दोन रुपयांची वीज महाग
राज्यात उद्योजकांना साडे सात ते आठ रुपये युनीट प्रमाणे विजेची आकारणी होत असते. गेल्या वेळी सरकारने दहा टक्के सवलत दिल्याने ते साडे पाच रुपयांपर्यत होते. उद्योगांना अशा सवलतीत वीज उपलब्ध होण्याची उद्योजकांची अपेक्षा आहे. शेजारच्या मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक राज्यांत महाराष्ट्रापेक्षा दोन रुपयांनी वीज स्वस्त आहे.