पेडणे : आपल्या सख्या मोठ्या भावानेच आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार १४ वर्षीय मुलीने आपल्या जबानीत केल्याने पेडणे तालुक्यात खळबळ उडाली आहे. गावडेवाडा, मोरजी येथील या १४ वर्षीय मुलीला फुस लावून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून पेडणे पोलिसांनी ११ जून रोजी भालखाजन, कोरगाव येथील प्रसाद सहदेव मालवणकर याला अटक केली होती. अधिक चौकशीसाठी त्याला १२ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता ४ दिवस पोलिस कोठडी रिमांड दिला आहे. त्यानंतर पिडीत मुलीने काल पोलिस व बीगर शासकीय संघटनेला दिलेल्या जबानीत आपल्याच मोठ्या भावानेही आपल्यावर बलात्कार केल्याचे सांगितले आहे. या पिडीत मुलीची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. भालखाजन, कोरगाव येथील प्रसाद मालवणकर याने ३ मे रोजी आपल्या मुलीला पळवून नेल्याची तक्र ार पिडीत मुलीच्या आईने पेडणे पोलिस स्टेशनवर गेल्या महिन्यात दिली होती. ११ रोजी पेडणे पोलिसानी पिडीत मुलीसह संशयित मालवणकर याला ताब्यात घेतले व वैद्यकीय तपासासाठी पाठवले असता पिडीत युवतीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संशयितावर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. मात्र १२ रोजी पिडीत मुलीने पोलिस व एनजीओला दिलेल्या जबानीत आपल्या सख्या मोठ्या भावानेही आपल्यावर बलात्कार केल्याचे म्हटल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. (प्रतिनिधी)आणखी संशयित आसू शकतात.पोलिसांनी कसून तपास केला तर आणखीही काही संशयित या प्रकरणात गुंतण्याचे आढळून येईल, अशी माहिती आशिला क डून मिळाली आहे. पेडणे पोलिस निरिक्षक तुषार लोटलीकर यांच्या कडे संपर्क साधला असता पिडीत मुलीने जबानीत आपल्या अल्पवयीन १७ वर्षीय भावाचे नाव घेतल्याने त्यालाही ताब्यात घेऊन चौकशी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१४ वर्षीय मुलीवर सख्या भावाकडून बलात्कार
By admin | Updated: June 13, 2014 07:01 IST