शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेट आणण्यास नकार दिल्याने १४ वर्षाच्या मुलाची हत्या

By admin | Updated: September 12, 2014 09:54 IST

सिगारेट आणून देण्यास नकार दिल्याने दिल्लीतील माथेफिरु तरुणांनी नववीत शिकणा-या विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ - सिगारेट आणून देण्यास नकार दिल्याने दिल्लीतील माथेफिरु तरुणांनी नववीत शिकणा-या विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याघटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले असून स्थानिकांमध्ये या घटनेमुळे असंतोष निर्माण झाला आहे. 
उत्तर पश्चिम दिल्लीतील वाझीपूर कॉलनीत राहणारा रंजन हा १४ वर्षीय विद्यार्थी त्याच्या मित्रासोबत क्लासवरुन परतत होता. रात्री आठच्या सुमारास कॉलनीतील बगीच्याजवळ चार ते पाच तरुण मद्यपान करत होते. या तरुणांनी रंजन व त्याच्या मित्राला थांबवले व पानटपरीतून सिगारेटचा बॉक्स आणून द्यायला सांगितले. मात्र अल्पवयीन असल्याने आम्हाला सिगारेट बॉक्स कुणीही देणार नाही असे कारण पुढे करत रंजनने सिगारेट आणून देण्यास नकार दिला. रंजनच्या नकारामुळे संतापलेल्या तरुणांनी रंजनला बेदम मारहाण केली तसेच यातील एका तरुणाने चाकूने रंजनवर वार केले.  या गुंडांच्या तावडीतून पळालेल्या रंजनच्या मित्राने घटनेची माहिती कॉलनीतील रहिवाशांना दिला व यानंतर हा प्रकार उघड झाला. मात्र रंजनचे कुटुंब आणि स्थानिक रहिवासी घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रंजनचा घटनास्थळीच मृत्यू झाला.