शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

१४... सारांश

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

सावंगी येथे कुपोषण जनजागृती अभियान

सावंगी येथे कुपोषण जनजागृती अभियान
कोदामेंढी : नजीकच्या सावंगी येथे स्वच्छता व कुपोषण जनजागृती अभियान राबविण्यात आले. यात ज्योती वरठी, मंगला देशमुख, लक्ष्मण परतेती, अर्जुन बावनकुळे, विठ्ठल महाकाळकर, नारायण हूड, वामन जुगनायके, मारोती बावनकुळे, मंदा वरखडे, प्रल्हाद मुंदे, देवचंद कुंभरे, रायवंता कोडवते, सुनील हूड, वंदना धुर्वे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
***
गतिरोधक तयार करण्याची मागणी
तारसा : मौदा-रामटेक मार्गावरील तारसा नजीकच्या वळणावर नेहमीच अपघात होतात. पूर्वी या वळणावर गतिरोधक तयार केले होते. मार्गाच्या दुरुस्तीमध्ये ते काढण्यात आले. अपघाताला आळा घालण्यासाठी या वळणावर गतिरोधक तयार करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
***
तारसा येथे कृत्रिम पाणीटंचाई
तारसा : स्थानिक थ्री फेस व सिंगल फेस लाईमध्ये वारंवार बिघाड निर्माण होतो. हा बिघाड दुरुस्त करण्यात लाईनमन हयगय करीत असल्याने वीजपुरवठ्याअभावी पाण्याची टाकी भरल्या जात नाही. त्यामुळे गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या सोडविण्याची मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे.
***
जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात
साळवा : कुही तालुक्यातील साळवा येथे जलयुक्त शिवार अभियानाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. यात मामा तलावांचे खोलीकरण करण्यात येणार असून, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव शेततळ्यांची निर्मिती व साफसफाई केली जाणार आहे. सदर अभियान लोकसहभागातून राबिवण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
***
सुरक्षा रक्षकांची परवड
रामटेक : शहरातील बहुतांश एटीएम मशीनजवळ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. त्या सुरक्षा रक्षकांना संबंधित संस्था अत्यल्प वेतन देत असल्याने त्या वेतनात त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाह करताना कसरत करावी लागत आहे. शासनाने या सुरक्षा रक्षकांच्या अवस्थेची दखल घेऊन त्यांचे वेतन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
***