शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१४... मौदा.... जलसमाधी

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

मजुरासह तीन जनावरांना जलसमाधी

मजुरासह तीन जनावरांना जलसमाधी
बोरगाव शिवार : सांड नदीतील घटना
मौदा : गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीच्या पात्रात उतरलेल्या मजुरासह तीन जनावरांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मौदा तालुक्यातील बोरगाव शिवारातील सांड नदीच्या पात्रात शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
पंजाब रतीराम भोंदे (५१, चिचोली, ता. मौदा) असे मृत मजुराचे नाव आहे. पंजाब हा बोरगाव येथील रामविलास गुप्ता यांच्याकडे नोकर (सालगडी) म्हणून काम करायचा. तो शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे बैलगाडीने शेतात जायला निघाला. त्याने बैलगाडीला दोन गाई व एक वासरूही बांधले होते. शेताच्या मार्गात सांड नदी असल्याने त्याने नदीच्या पात्रात बैलगाडी थांबविली. त्याचवेळी बैलगाडीला जुंपलेले बैल व मागे बांधलेल्या गाई व वासरूही पाणी पित होते. पंजाब हा बैलगाडीवरच बसला होता. दरम्यान, बैलांनी बैलगाडी पुढे ओढत खोल पाण्यात नेली.
बैलगाडीवरून उडी मारून पाण्याबाहेर येणे शक्य नसल्याने जनावरांसह तोही खोल पाण्यात बुडाला. काही वेळाने बोरगाव येथील ग्रामस्थ नदीकडे आले असता त्यांना नदीच्या पाण्यात जनावरे तरंगाना आढळून आले. ही बातमी गावात कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यातच मौदा पोलिसांना सदर घटनेची सूचना देण्यात आली. पोलिसांनी मौदा येथील काही कोळी बांधवांना पाचारण केले. त्यांनी दोन्ही गाई व वासराचा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर पंजाबच्या मृतदेहाचा शोध घेतला. तीन तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना पंजाबचा मृतदेह गवसला.
पंजाबला खुशाल नावाचा एकुलता एक मुलगा आहे. पंजाबच्या पत्नीचा दोन वर्षांपूर्वी विहिरीत पडून मृत्यू झाला. आता वडिलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने खुशाल पोरका झाला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
***