१४ मार्केटच्या गाळेधारकांना वसुलीची नोटीस पळवाट : ४ मार्केटसाठी शासन मार्गदर्शनाची प्रतीक्षा
By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST
जळगाव : मनपाच्या कराराची मुदत संपलेल्या १८ मार्केटपैकी ४ मार्केटबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आल्याने ते ४ मार्केट वगळून उर्वरीत १४ मार्केटमधील गाळेधारकांना मनपा किरकोळ वसुली विभागातर्फे थकबाकी वसुलीची बिले बजावण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला.
१४ मार्केटच्या गाळेधारकांना वसुलीची नोटीस पळवाट : ४ मार्केटसाठी शासन मार्गदर्शनाची प्रतीक्षा
जळगाव : मनपाच्या कराराची मुदत संपलेल्या १८ मार्केटपैकी ४ मार्केटबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आल्याने ते ४ मार्केट वगळून उर्वरीत १४ मार्केटमधील गाळेधारकांना मनपा किरकोळ वसुली विभागातर्फे थकबाकी वसुलीची बिले बजावण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला. मसुदा मंजूरगाळेधारकांकडे असलेल्या कराच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी थकबाकीची रक्कम त्यांच्या मालमत्तेवरील घरपीतून वसुल करण्याची नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यासाठी किरकोळ वसुली विभागातर्फे मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यास आयुक्तांनी सोमवारी मंजुरी दिली.पुढील आठवड्यात बजावणार नोटीसया नोटीसवर गाळेधारकांचे नाव टाकून त्या वाटपाचे काम चार-पाच दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली. ---- इन्फो---शासन उत्तराची प्रतीक्षाशासनाने ठराव क्र.१३५ बाबत दिलेल्या निर्णयात ४ मार्केट शासनाच्या मालकीच्या जागेवर असल्याने त्याबाबतचा निर्णय शासन घेईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने कराच्या थकबाकी वसुलीची बिले बजावण्यासाठीही पळवाट काढत या चार मार्केटबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. २ जानेवारी रोजी याबाबतचे पत्र शासनाकडे पाठविले आहे. मात्र महिना उलटूनही त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान या ४ मार्केटच्या गाळेधारकांची बिलेही तयार करण्यात आली असून शासनाकडून उत्तर येताच बिले वाटप केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.