शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१४ मच्छीमारांना वाचविले

By admin | Updated: February 8, 2016 04:31 IST

उत्तर गोव्याच्या किनाऱ्यापासून सुमारे ८0 किलोमीटरवर खवळलेल्या खोल समुद्रात बुडणाऱ्या ट्रॉलरवरील १४ मच्छीमारांचे प्राण तटरक्षक दलाने वाचविले

वास्को (गोवा) : उत्तर गोव्याच्या किनाऱ्यापासून सुमारे ८0 किलोमीटरवर खवळलेल्या खोल समुद्रात बुडणाऱ्या ट्रॉलरवरील १४ मच्छीमारांचे प्राण तटरक्षक दलाने वाचविले. कन्याकुमारीतील ‘निक्सिमोळ’ ट्रॉलरमध्ये पाणी शिरले असून, तो बुडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती तटरक्षक दलाच्या मुंबईतील मुख्यालयास शनिवारी रात्री १०च्या सुमारास मिळाली. त्यानंतर तातडीने हालचाली करण्यात आल्या. मुरगाव बंदरातील आयसीजीएस सी ४१0 नौका गोव्यातून रात्री मदतकार्यासाठी तातडीने रवाना झाली. ट्रॉलरपर्यंत पोहोचेपर्यंत तटरक्षक दलाचे जवान मच्छीमारांशी तसेच ट्रॉलरच्या मालकाशी सतत संपर्कात होते. ट्रॉलरमध्ये पाणी शिरू लागले होते, ते काढून टाकण्यासाठी खलाशांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या; पाणी इंजिनपर्यंत पोहोचले असते तर ट्रॉलर बंद पडून १४ही मच्छीमार बुडाले असते. ११ मच्छीमारांना तटरक्षक दलाच्या नौकेत घेण्यात आले आणि तीन मच्छीमारांना ट्रॉलरवर ठेवून तो ओढत पहाटे ५.१५च्या सुमारास गोवा बंदरात आणण्यात आला.तटरक्षक दलाचे उपकमांडर करण किशोर यांच्या नेतृत्वाखाली ए.के. शर्मा, एम. बॅनर्जी, बी. सेल्वाराज, आर.के. शर्मा, मुकेश कुमार, प्रवीण कुमार, व्ही.पी. प्रभू, एम.बी. मूर्ती आणि एम. मणिकंदन यांनी मदतकार्य राबविले.