मेहरूण तलावातून काढला १३९७ ब्रास गाळ
By admin | Updated: May 27, 2016 22:50 IST
जळगाव : मेहरूण तलावातून गाळ काढण्याच्या मोहिमेत शुक्रवारी सुमारे १३९७ ब्रास काढण्यात आला. दरम्यान उपमहापौर ललित कोल्हे यांच्या आवाहनावरून रेमंड कंपनीनेदेखील या कामात सहभाग नोंदवित १ पोकलेन व ८ डंपर, २ निरीक्षक असा ताफा दिला.
मेहरूण तलावातून काढला १३९७ ब्रास गाळ
जळगाव : मेहरूण तलावातून गाळ काढण्याच्या मोहिमेत शुक्रवारी सुमारे १३९७ ब्रास काढण्यात आला. दरम्यान उपमहापौर ललित कोल्हे यांच्या आवाहनावरून रेमंड कंपनीनेदेखील या कामात सहभाग नोंदवित १ पोकलेन व ८ डंपर, २ निरीक्षक असा ताफा दिला. कंपनीचे महाव्यवस्थापक संजय बोकारे, व्यवस्थापक संजय शरन, सामान्य प्रशासन विभागाचे शिवाजी दाभाडे यांनी कोल्हे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तातडीने मशिनरी उपलब्ध करून दिली आहे.