शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

१३४ कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन १७ हजार शेतकर्‍यांना लाभ : १९३७ कोटींचे पीक कर्ज वाटप

By admin | Updated: August 1, 2016 23:57 IST

जळगाव : जिल्‘ातील १७ हजार ६३ थकबाकीदार शेतकर्‍यांच्या १३४ कोटी ८४ लाख रुपयांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तर एक लाख ८५ हजार १८८ शेतकर्‍यांना १९३७ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

जळगाव : जिल्‘ातील १७ हजार ६३ थकबाकीदार शेतकर्‍यांच्या १३४ कोटी ८४ लाख रुपयांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तर एक लाख ८५ हजार १८८ शेतकर्‍यांना १९३७ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थिती आणि ५० टक्के आणेवारी असलेल्या गावातील थकबाकीदार शेतकर्‍यांकडून कर्जाची सक्तीने वसुली न करता पीक कर्जाचे पुनर्गठन करावे अशी सूचना शासनातर्फे करण्यात आली होती. त्यानुसार पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ३१ जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती.

१३४ कोटींच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन
या वर्षी जिल्हा बँकेकडून तीन हजार ४६९ शेतकर्‍यांच्या १५ कोटी २२ लाखांच्या कर्जाचे पुनर्गठन केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकामार्फत १२ हजार ६३० शेतकर्‍यांच्या १११ कोटी ५१ लाखांच्या थकित कर्जाचे तर खाजगी बँकांकडून ९५७ शेतकर्‍यांच्या ८ कोटी १ लाखांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. ग्रामीण बँकेने ६ शेतकर्‍यांच्या ९ लाखांच्या कर्जाचे पुनर्गठन केले आहे.
१९३७ कोटींचे पीककर्ज वाटप
जिल्हा बँक व खाजगी बँकांकडून पीक कर्ज वाटपाला गती देण्यात आली आहे. जिल्हा बँकेतर्फे एक लाख २२ हजार ६२९ शेतकर्‍यांना ८९७ कोटी ९२ लाखांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकेतर्फे ५८ हजार ५३३ शेतकर्‍यांना ९७० कोटी ४५ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. ग्रामीण बँकेतर्फे ५८३ शेतकर्‍यांना ८ कोटी ४३ लाख तर खाजगी बँकेकडून ३ हजार ४४३ शेतकर्‍यांना ६० कोटी २५ लाखांच्या रकमेच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. पीक कर्जवाटपाची अंतिम मुदत ही ३० सप्टेंबरपर्यंत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी २६०६ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.