शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

१३ हजार कोटींचा काळा पैसा उघड

By admin | Updated: June 28, 2016 04:25 IST

विदेशी बँकांमध्ये अघोषित उत्पन्न दडवून ठेवणाऱ्यांवर सरकारने कारवाई सुरू करताच त्याची चांगली निष्पत्ती दिसू लागली

नवी दिल्ली : विदेशी बँकांमध्ये अघोषित उत्पन्न दडवून ठेवणाऱ्यांवर सरकारने कारवाई सुरू करताच त्याची चांगली निष्पत्ती दिसू लागली असून, आयकर अधिकाऱ्यांना २०११ आणि १३मध्ये मिळालेल्या अवघ्या दोन माहितीसंचाच्या आधारे १३ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम हुडकून काढण्यात यश आले आहे. किमान ४०० भारतीयांनी जिनेव्हातील एचएसबीसी बँकेत पैसा जमा केला असून, फ्रान्स सरकारने २०११मध्ये त्याबाबत माहिती दिली होती. त्या आधारावर आयकर अधिकाऱ्यांनी भारतीयांचा ८,१८६ कोटींचा अघोषित पैसा हुडकून काढला. हा पैसा गुंतवणाऱ्यांवर ३१ मार्च २०१६पर्यंत ५,३७७ कोटी रुपयांचा कर आकारण्यात आला असल्याचे आयकर आढावा अहवालात नमूद करण्यात आले आहे. एचएसबीसी बँकेकडून ६२८ बँक खातेधारकांची माहिती मिळाली आहे. त्यापैकी २१३ जणांवर कारवाई करता आलेली नाही, कारण त्यांच्याकडे एकतर पैसा नाही किंवा ते अनिवासी भारतीय आहेत. तर काही प्रकरणांमध्ये बचतकर्त्यांचा शोध घेता आलेला नाही. ३९८ प्रकरणांमध्ये आयकर समेट आयोगाने वाद मिटवला असून, आढाव्यासंबंधी पुढील प्रक्रिया थांबविली असल्याचे अहवालात म्हटले आहे. एचएसबीसीच्या प्रवक्त्याने मात्र खातेधारकांबाबत भाष्य टाळले. (लोकमत न्यूज नेटवर्क)एक खिडकी योजनेचा लाभ नाहीआयसीआयजे संबंधी प्रकरणांमध्ये नाव आलेल्या काही भारतीयांनी २०१५मध्ये काळा पैसा स्वेच्छेने घोषित करण्यासंबंधी खिडकी योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आयकर विभागाने ज्यांच्याविरुद्ध आधीच तपास सुरू केला अशांना सरकारकडून कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ७०० भारतीयांच्या विदेशी खात्यांमध्ये पाच हजार कोटी रुपये साठवल्याची माहिती आयकर विभागाने मिळवली. या विभागाने आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये सहेतुक कर बुडविण्याच्या आरोपांखाली ५५ जणांविरुद्ध तर जिनेव्हा बँक खात्यांबाबत ७५ खटले दाखल केले आहेत.