शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्यात 13 जवान जखमी

By admin | Updated: June 13, 2017 23:41 IST

पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सीआरपीएफच्या 180व्या बटालियनच्या तळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकून हल्ला केला.

ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 13 - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांच्या अनेक ठिकाणांवर हल्ले चढवले आहेत. सीआरपीएफ कॅम्प, पोलीस स्टेशनसारख्या 6 वेगवेगळ्या ठिकाणांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 13 सुरक्षा जवान जखमी झाले आहे. पाकिस्तानातील अल उमर मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मद यांनी या दहशतवादी संघटनांनी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सीआरपीएफच्या 180व्या बटालियनच्या तळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकून हल्ला केला. ग्रेनेडच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 10 जवान जखमी झालेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. दहशतवादी हल्ला केल्यानंतर सुरक्षा पथकाने त्रालमध्ये नाकाबंदी केली आहे. तसेच सीआरपीएफचे जवान दहशतवाद्यांचा कसून शोध घेत आहेत. सीआरपीएफच्या तळावरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
तर गेल्या काही दिवसांपूर्वी काश्मीरमधल्या बंदीपोरामध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता,   त्या हल्ल्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 45व्या बटालियनच्या कॅम्पला लक्ष्य केलं होतं.
मात्र जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 4 दहशतवादी ठार झाले होते. त्यामुळे लष्करानं आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. तत्पूर्वी 3 जून रोजी लष्कराच्या ताफ्यावर अशाच प्रकारचा दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. तसेच जवळपास चार जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. अनंतनाग येथील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.

 

जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लष्कराचा ताफा राष्ट्रीय महामार्गावरून लोअर मुंडा येथून जात असताना दक्षिण काश्मीरजवळील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हल्ला चढवला", अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिका-याने दिली होती. चार जवान जखमी झाले होते. गंभीररीत्या जखमी झालेले दोन जवान शहीद झाले होते. त्यावेळीही संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होते.