कोलकाता : कोट्यवधीच्या शारदा चिटफंड घोटाळ्यात अटक झालेले माजी केंद्रीय मंत्री मतंगसिंग यांना शहर न्यायालयाने १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करता आले नाही.शनिवारी अटक झाल्यानंतर मतंगसिंग यांनी प्रकृती बिघडल्याचे सांगितल्यानंतर, त्यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यायालयात त्यांच्या अटकेसंबंधी कागदपत्रे सादर केल्यानंतर, अतिरिक्त न्यायदंडाधिकारी चक्रवर्ती यांनी मतंगसिंग यांना न्यायालयीन कोठडीत नेण्याचा आदेश दिला.
मतंगसिंग यांना १३ दिवसांची कोठडी
By admin | Updated: February 2, 2015 06:23 IST