शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी १२ ‘वॉकी-टॉकी’

By admin | Updated: July 5, 2017 23:24 IST

आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी १२ ‘वॉकी-टॉकी’

मुंबई, दि.5 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन दिवसांच्या ऐतिहासिक दौ-यानिमित्ताने लोकमतच्या ऑनलाइन टीमने केलेल्या वृत्तांकनाची दखल थेट इस्रायलमध्येही घेतली गेली आहे. लोकमतने केलेल्या बातम्या, विशेष लेखांचे इंग्रजीत भाषांतर इस्त्रायलमधील सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. याशिवाय या वृत्तांकनामुळे ज्यू बांधवांच्या मनामध्येही लोकमतचं विशेष स्थान निर्माण झालं आहे.  
 
गेल्या पन्नास ते सत्तर वर्षात इस्रायलमध्ये स्थायिक झालेल्या बेने इस्रायली नागरिकांच्या नव्या पिढीला फक्त इंग्रजी आणि हिब्रू भाषाच अवगत आहेत. लोकमतने प्रसिद्ध केलेल्या बातम्या वाचण्याची उत्सुकता या नव्या पिढीला होती पण भाषेच्या अडथळ्यामुळे ते शक्य होत नव्हते. अखेरीस मागच्या पिढीतील लोकांनीच पुढे येऊन लोकमतमध्ये प्रसिद्ध केलेले लेख इंग्रजी व हिब्रूमध्ये भाषांतरित केले. यातील काही फीचर आणि लेख सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बेने इस्रायली नागरिकांनी सर्वांना पाठवली. 
 
लोकमतने बेने इस्रायली इतिहासकार एलियाझ दांडेकर यांचा लेख इंग्रजीतून अनुवाद करुन प्रसिद्ध केला होता, मात्र दांडेकर यांनाच तो मराठीत असल्यामुळे वाचता येत नव्हता, शेवटी त्यांच्या वृद्ध आत्याने त्याची प्रत्येक ओळ वाचून हिब्रूमध्ये समजावून सांगितली. अशीच स्थिती मुंबईचे महापौर डॉ. इ. मोझेस यांच्या लेखाबाबतही होती. सर्वांनी हा लेख सोशल मीडियावर शेअर केला, पण त्यांना मराठी वाचता येत नव्हते. हा लेख सॅम्युएल कुरुलकर यांनी इंग्रजीत प्रसिद्ध केला. लोकमतने मोझेस यांच्या कार्यावर टाकलेल्या प्रकाशाची दखल भारतीय व इस्रायली ज्यूंनी घेतली व आपल्याच बांधवाची दखल मराठी माध्यमाने घेतल्याबद्दल लोकमतचे आभारही मानले.
 
डॉ. इ. मोझेस हे मुंबईचे पहिले ज्यू महापौर असूनही त्यांच्याबद्दल मराठी आणि बेने इस्त्रायली लोकांनाही फारशी माहिती नव्हती, परंतू लोकमतने त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल  डॉ. मोझेस यांच्या वंशजांनी लोकमतचे आभार मानले आहे.         लोकमतच्या इस्त्रायल वृत्तांकनाची एक झलक -  
 
मोदींच्या इस्रायल दौ-यानिमित्ताने मुंबईच्या ज्यू महापौरांचे स्मरण...
मुंबई उपनगरी रेल्वेचे महालक्ष्मी स्थानकापासून वरळी नाक्यापर्यंत जाणारा रस्ता आज शहरातील अनेक गजबजलेल्या रस्त्यांपैकी एक आहे. एकेकाळी हेन्स रस्ता असे नाव असलेल्या या रस्त्याला आता डॉ. इ. मोझेस रोड या नावाने ओळखले जाते. वरळी नाक्यावर रस्त्याचे एक नाव सांगणारी एक पाटी सोडली तर डॉ. मोझेस "नाही चिरा नाही पणती" अशा अवस्थेत जावे इतक्या विस्मृतीत गेले आहेत. डॉ. एलिजाह मोझेस (राजपूरकर) हे मुंबईचे पहिले आणि एकमेव ज्यू धर्मिय महापौर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना सर्वात प्रथम न्यू यॉर्कमध्ये भेटले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीलाच डॉ. मोझेस हे मुंबईचे महापौर होते अशी माहिती नेत्यानाहूंना दिली. आता पंतप्रधान तीन दिवसांच्या भेटीसाठी इस्रायलला जाणार आहेत. या निमित्ताने डॉ. मोझेस यांच्या कार्याचे स्मरण करण्याची आपल्या सर्वांना संधी मिळाली आहे. आणखी वाचण्यासाठी क्लिक करा-(मोदींच्या इस्रायल दौ-यानिमित्ताने मुंबईच्या ज्यू महापौरांचे स्मरण...)
 
नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी बेने इस्रायली समुदाय उत्सुक-
 
नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी बेने इस्रायली समुदाय उत्सुक- बेने इस्रायली समुदाय हा भारतातून इस्रायलमध्ये आलेल्या पाच ज्यू समुदायांपैकी एक आहे. बेने इस्रायलींसह कोचीनी, बगदादी, बेने मनाशे, बेने एफ्राइम हे भारतातून आलेले ज्यू समुदाय इस्रायलमध्ये राहतात. बेने इस्रायली समुदाय दोन हजार वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर राहात होता. 18 व्या शतकामध्ये हा समुदाय सर्व भारतभर पसरला. या समुदायाने विविध काळामध्ये भारताच्या विकासात योगदान दिले आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या आंदोलनामध्येही बेने इस्रायलींनी सहभाग घेतला होता. उदाहरणच द्यायचे झाले तर महात्मा गांधींचे वकिल आणि डॉक्टर दोघेही या समुदायाचेच सदस्य आणि दोघेही एरुलकर कुटुंबातील होते. आणखी वाचण्यासाठी क्लिक करा-(नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी बेने इस्रायली समुदाय उत्सुक)
 
इस्रायली शहराच्या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी दिले होते बलिदान- 
 
भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित होण्याला यंदा 25 वर्षे पुर्ण होत आहेत. याच महत्त्वाच्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देत आहेत. आजपासून सुरु झालेल्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान तेथील भारतीय वंशाचे ज्यू बांधव, अनेक उद्योगांचे अध्यक्ष तसेच तेल अविव, जेरुसलेम या महत्त्वाच्या शहरांना भेट देणार आहेत. याबरोबरच हैफा या इस्रायलमधील प्राचीन शहरातील भारतीय सैनिकांच्या स्मृतीस्थळ आणि स्मशानासही ते भेट देतील. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटीश लष्करासाठी भारतीय जवान लढत असताना त्यांना इस्रायलमध्ये वीरगती प्राप्त झाली होती. 1918 साली इस्रायलमध्ये बलिदान देणाऱ्या या जवानांच्या स्मृतीसाठी भारतीय लष्कर आजही 23 सप्टेंबर रोजी "हैफा डे" साजरा करते. आणखी वाचण्यासाठी क्लिक करा-  (इस्रायली शहराच्या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी दिले होते बलिदान)