जोराहट (आसाम) : आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात आज रविवारी पहाटे एका प्रवासी वाहनाला ट्रकने दिलेल्या धडकेत १२ ठार तर ८ जण जखमी झाले़ मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे़गोलाघाट जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ३७ वर पहाटे ४.३० च्या सुमारास हा अपघात झाला़ दरेगाव गावातील निवासी लखीमपूर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते़ तेथून एका भाड्याच्या वाहनाने परतत असताना लोटाबाडी नजीक त्यांच्या वाहनाला एका ट्रकने जोरदार धडक दिली़ अपघात इतका भीषण होता की, १२ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला़ वाहन चालकाने वेळीच उडी घेतल्याने तो अपघातातून बचावला़ (वृत्तसंस्था)
आसामात अपघात १२ ठार; ८ जखमी
By admin | Updated: February 9, 2015 00:22 IST