१२... गुन्हे... जोड...०१
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
मेटॅडोरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
१२... गुन्हे... जोड...०१
मेटॅडोरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूखापा परिसरातील अपघात : वाहनचालकास अटकखापा : भरधाव मेटॅडोरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापा शिवारात बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. सुभाष रामचंद्र बागडे (२६, रा. खापा, ता. सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुभाष हा एमएच-३१/डीएस-२७४० क्रमांकाच्या मोटरसायकलने खाप्याकडे येत होता. त्याच वेळी डीजेचे बॉक्स घेऊन एमएच-०१/एच-३६५५ क्रमांकाचा भरधाव मेटॅडोर खाप्याहून नागपूरकडे जात होता. दरम्यान, खापा परिसरात या मेटॅडोरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात सुभाष गंभीर जखमी झाला. त्यातच त्याच्या डोक्यावर डीजेचा बॉक्स कोसळला. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी खापा पोलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, मेटॅडोर चालक जगदीश मनोहर नरड (४८, रा. नागपूर) याला अटक केली. सदर घटनेचा तपास खापा पोलीस करीत आहे.***टिप्परची दुचाकीला धडक, एक ठारमौदा : भरधाव टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या दुुचाकी चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी फाटा परिसरात बुधवारी मध्यरात्री घडली.अरुण मुन्नालाल गौर (३५, रा. नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अरुण हा एमएच-३१/बीव्ही-५७७० क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होता. दरम्यान, सावळी फाटा परिसरात एमएच-३६/१६५८ क्रमांकाच्या भरधाव टिप्परने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.***विहिरीत उडी घेऊन आत्म्हत्याकोंढाळी : विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचोलीपठार येथे बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारस घडली. हरिश्चंद्र नेहारे (५०, रा. चिचपठार) असे मृताचे नाव आहे. हरिश्चंद्रने गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. काहींनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.