कोल्हापूर : महापालिकेच्या लोकशाही दिनात सोमवार एकूण १२ अर्ज दाखल झाले. लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात यावे अशा सुचना आयुक्त पी.शिवशंकर यांनी यावेळी संबधित अधिकार्यांना दिल्या.प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवार लोकशाही दिनात आयोजित करण्यात येतो.सोमवार झालेल्या दिनातील अर्जापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबधित आठ,नगररचना विभागाशी संबधित एक तर घरफाळा विभागाशी संबधित एक ,आरोग्य विभागाशी संबधित दोन अर्ज आहेत.यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई,उपायुक्त विजय खोराटे, अश्विनी वाघमळे,सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.==============
लोकशाही दिनात १२ अर्ज
By admin | Updated: February 2, 2015 23:53 IST