शिमला: हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात टेकडीचा काही भाग कोसळला आहे. यामुळे 116 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनामुळे ही जनावरं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. या जनावरांसह एका गुराख्याचाही ढिगाऱ्याखाली अडकल्यानं मृत्यू झाला आहे. कुल्लूमधील निर्मांड भागात ही घटना घडली. टेकडीचा भाग अतिशय मोठा असल्यानं जनावरं आणि गुराख्याला ढिगाऱ्याखालून बाहेर येता आलं नाही. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. विकास खंड निर्मंडच्या सरघा पंचायतीच्या हुमकू डोंगर परिसरात भूस्खलन झालं. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. याशिवाय 110 मेंढ्या, तीन गायी आणि काही बकऱ्यांचा मृत्यू झाला. भूस्खलनाची कल्पना येताच सहा गुराख्यांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढले. सध्या या ठिकाणी ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे.
हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे गुराख्यासह 116 प्राण्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 08:26 IST