शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

नसबंदी शस्त्रक्रियेनंतर 11 महिलांचा मृत्यू

By admin | Updated: November 12, 2014 02:44 IST

कुटुंब नियोजन शिबिरात नसबंदीची शस्त्रक्रिया केल्यानंतर 11 महिलांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आह़े

छत्तीसगडमध्ये वैैद्यकीय निष्काळजीपणाचा कहर : चार वैद्यकीय अधिकारी तडकाफडकी निलंबित; घटनेच्या चौकशीचे आदेश
बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात राज्यसरकारतर्फे आयोजित कुटुंब नियोजन शिबिरात नसबंदीची शस्त्रक्रिया केल्यानंतर 11 महिलांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आह़े अद्यापही 49 महिलांची प्रकृती गंभीर आह़े या घटनेनंतर सरकारने चार वैद्यकीय अधिका:यांना हलगर्जीपणा केल्याबद्दल तडकाफडकी निलंबित केले असून शस्त्रक्रिया करणा:या मुख्य शल्यविशारदाविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले                 आहेत़ प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत़
बिलासपूर जिल्ह्यातील सकरी (पेन्डारी) गावातील नेमीचंद जैन कॅन्सर रिसर्च सेंटर या खासगी रुग्णालयात गत शनिवारी शासकीय कुटुंब कल्याण आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होत़े 
या शिबिरात तखतपूर ब्लॉक आणि बिलासपूरच्या आजूबाजूच्या खेडय़ातील 83 महिलांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली़ शस्त्रक्रियेनंतर  सर्वाना रात्री उशिरा औषधोपचार करून सुटी देण्यात आली़ मात्र यानंतर 24 तासांतच  यापैकी बहुतांश महिलांना डोकेदुखी, उलटय़ा आणि तीव्र पोटदुखीचा त्रस होऊ लागला़ या त्रसानंतर 6क् महिलांना विविध रुग्णालयात भरती करण्यात आले होत़े त्यापैकी अकरा महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ मृत महिला 32 पेक्षा कमी वयोगटातील आहेत़ 
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे राज्य समन्वयक डॉ़ क़ेसी़ ओराम़ बिलासपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ़ एस़सी़ भांग, तखतपूरचे विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रमोद  तिवारी आणि एक शासकीय सजर्न                       डॉ़ आऱक़े गुप्ता यांचा समावेश         आह़े 
गुप्ता यांनीच महिलांवर नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे कळत़े या घटनेनंतर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्री रमण सिंह तसेच आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली़ (वृत्तसंस्था)
 
4छत्तीसगड सरकारने प्रारंभी मृत महिलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली होती़ मात्र नंतर मुख्यमंत्र्यांनी ही रक्कम चार लाख रुपयांर्पयत वाढवली़ प्रकृति गंभीर बनलेल्या महिलांना प्रत्येकी 5क् हजार रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली व त्यांच्या संपूर्ण उपचाराचा खर्चही राज्य सरकार करणार असल्याचे सांगितल़े
 
हाइपोवॉलूमिक शॉक किंवा सेप्टिकमुळे मृत्यू?
4नसबंदी शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झालेल्या 11 महिलांपैकी एकीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आह़े यात मृत्यूचे कारण कथितरीत्या हायपोवॉलूमिक शॉक वा सेप्टिक असल्याचे कळत़े
 
4प्राथमिक तपासाअंती शस्त्रक्रियेदरम्यानच्या हलगर्जीपणामुळे 11 महिलांना जीव गमवावा लागला आह़े या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून यासाठी एका त्रिसदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आह़े, असे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी सांगितले.
 
4नसबंदी शस्त्रक्रियेदरम्यानचा हलगर्जीपणा आणि त्यामुळे 11 महिलांचा मृत्यू या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई       करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड सरकारला दिले आह़े या घटनेवर त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केल़े