श्रीनगर : अमरनाथ यात्रा सुरू झाल्यानंतर लगेच हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या ११ सशस्त्र दहशतवाद्यांचे लष्करी वेषातील सामूहिक छायाचित्र फेसबुकवर अपलोड करण्यात आल्याने काश्मीर खोऱ्यात खळबळ उडाली आहे. हे छायाचित्र दक्षिण काश्मीरच्या शोपियन किंवा पुलवामा जिल्ह्यातील जंगलात काढले असावे, असा अंदाज आहे. या भागातून सध्या विविध दहशतवादी संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांची भर्ती सुरू आहे. हे छायाचित्र दोन दिवस फेसबुकवर फिरत होते. त्यानंतर काढून टाकण्यात आले. या छायाचित्रातील तरुण अलीकडेच दहशतवादी हिजबुलमध्ये सामील झाल्याचे समजते. यात जम्मू-काश्मीरचा माजी पोलीस कॉन्स्टेबल नासीर आणि त्रालमधील रहिवासी असलेला बुरहान वानी या दोघांचा समावेश आहे. नासीर हा दोन एके-४७ रायफलींसह पळाला होता.
११ दहशतवाद्यांचा फोटो फेसबुकवर
By admin | Updated: July 4, 2015 04:00 IST