शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

१०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर

By admin | Updated: July 5, 2015 22:55 IST

जलवाहतुकीला चालना देण्यास उत्सुक असलेले रालोआ सरकार संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात देशभरातील १०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करण्याबाबतचे विधेयक सादर करणार आहे.

नवी दिल्ली : जलवाहतुकीला चालना देण्यास उत्सुक असलेले रालोआ सरकार संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात देशभरातील १०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करण्याबाबतचे विधेयक सादर करणार आहे. भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.नद्यांचे जलमार्गात रूपांतर केल्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल. कारण हे मालवाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन आहे. त्यामुळे सरकारने १०१ नद्यांना जलमार्गात रूपांतरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे नमूद करून गडकरी म्हणाले, संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक आणण्यात येईल. जलमार्गांना चालना देण्याला आपल्या मंत्रालयाने प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे रस्ता व रेल्वे नेटवर्कवरील बोजा कमी होईल; सोबतच एक स्वस्त आणि पर्यावरण अनुकूल असे वाहतुकीचे माध्यमही मिळेल. वाहतुकीचे स्वस्त साधन असलेल्या जलमार्गाचा भारतात अद्याप वापर करण्यात आलेला नाही. तथापि, चीनच्या मालवाहतुकीत जलमार्गाचा ४७ टक्के आणि युरोपच्या मालवाहतुुकीत जलमार्गाचा ४० टक्के वाटा आहे. जपान आणि कोरिया तर जलमार्गावरच निर्भर आहेत. (वृत्तसंस्था) प्रकल्प पीपीपी आधारावर पूर्ण करणारसरकारने आतापर्यंत केवळ पाच नद्यांना जलमार्गाच्या रूपात घोषित केले आहे, तर ५५ नद्यांसाठी सल्लागारांची निवड करण्यात आली आहे. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. हे प्रकल्प पीपीपी आधारावर पूर्ण केले जातील. भारतात मात्र केवळ ३.३ टक्के जलवाहतूक केली जाते, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.